Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Wednesday, August 1, 2018

Cityblog Users Contributions

Upendra
अपघात स्थळी स्व खर्चानी पोचून, मृतदेह वर काढण्यासाठी दर्‍याखोर्‍यांमधे उतरून स्वतःच्या जिवाची बाजी लावणार्‍या ट्रेकर्सना सरकार आर्थिक मदत कधी देणार ?
🙏नमस्कार,
.
नुकतीच कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांच्या आंबेनळीघाटातील दुर्देवी अपघाताची घटना आपण सर्वांनी ऐकली,पाहिली. नेहमीप्रमाणे मृतांना सरकारी मदत जाहीर झाली. वाहिन्यांनी ब्रेकींग न्युजचा रतीब घातला. खासदार,आमदार,छोटेमोठे राजकीय नेते, समाजसेवक, स्वयंसेवक सर्वजण मदतीला, बाईट द्यायला धावले, वगैरे वगैरे.........
पण या सर्व घटनेत, जे ट्रेकिंग ग्रुपस, मंडळं व त्यांचे सदस्य तक्षणी मदतीला धावले, जे पावसापाण्यात, दगडधोंड्यांंमधून मिळेल तसा मार्ग काढत जंगलात उतरले, मृतदेहांचा शोध घेऊन ते हाताने उचलून, प्रसंगी खांद्यांवर वाहुन आणून, विखुरलेले छिन्नविछ्छीन्न अवयव गोळा करुन त्या भीषण काळदरीतुन वरती आणून पुढील कार्यवाहीसाठी ज्यांनी अधिकार्‍यांच्या हवाली केले, त्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत का मिळू नये?
महाराष्र्टातील सध्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर एक वेडगळ प्रश्न मुख्यत्वाने मनाला भिडतो, तो म्हणजे ते दुर्देवी जीव आणि त्यांना उचलून नेणारे या दोघांनी एकमेकांना "जात" विचारली असेल का? सुज्ञ उत्तर अर्थातच 'नाही', कारण जगाच्या पाठीवर एकवेळ जीवाला जात नसेल पण प्रत्येक जातीला जीव हा असतोच आणि म्हणूनच त्या जीवाचं मोल प्रत्येकजण जाणतो, ओळखतो, मदतीला धावतो. सामाजिक समरसतेच्या, मानवतेच्या भावनेने भारुन, संकटात बेभानपणे पाय रोवून उभे राहणार्‍या, मदतीला धावणार्‍या साहसी श्रमिक तरुणांना सरकारकडून अशी सबळ आर्थिक मदत विशेषत्वाने व्हायला हवी.
तुम्हांला काय वाटतं? कृपया पटत असल्यास हा संदेश पुढे पाठवा.
आपण सर्वजण मिळून त्यांच्यासाठी एवढा एक प्रयत्न तर करु शकतोच ना?
धन्यवाद !!
🙏
— मोहक वेलणकर


No comments:

Post a Comment