Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Saturday, September 22, 2018

Cityblog Feature: MPC News

Pune : डीजे-डॉल्बी नाही म्हणजे नाहीच ! मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Pune: गणपती विसर्जनादिवशी शहरातील प्रमुख 17 रस्ते राहणार बंद

एमपीसी न्यूज- डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी व्यावसायिकांना दिलासा मिळालेला नाही. ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेता उच्च न्यायालयाने डीजे-डॉल्बीवरील बंदी काढता येणार नाही असे म्हटले आहे. याआधी ‘डीजे-डॉल्बी नाय म्हणजे नाय’, अशी ठाम भूमिका घेत राज्य सरकारने सणासुदीच्या काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या या वाद्यांवरील बंदीचे मुंबई उच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले.
डीजे- डॉल्बी आणि त्यासारखी इतर हाय डेसिबल ऑडीओ सिस्टीम ही कानठळय़ा बसविणारी अद्ययावत यंत्रणा आहे. डीजेचा स्वीच ऑन करताच त्याचा डेसिबल लेव्हल शंभरी पार करतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. ही बाब लक्षात घेऊनच सणासुदीच्या काळात या ऑडीओ सिस्टीमला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात ठणकावून सांगितले होते.
राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे डीजे-डॉल्बीच्या व्यवसायात असलेल्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नक्की काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. कालच पुण्यात 10 मंडळांविरोधात ध्वनी प्रदूषण केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता परवा होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळ काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे असणार आहे.
Pune : गणपती विसर्जनादिवशी शहरातील प्रमुख 17 रस्ते राहणार बंद

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात गणेश विसर्जनादिवशी मिरवणूक पाहायला येणा-या नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा आहे. येत्या रविवारी (दि.23) शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यावर्षी देखील वर्तुळाकार मार्गाची आखणी करण्यात आली आहे.
शहरातील लक्ष्मी रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, गुरूनानक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन रोड, भांडारकर रोड, पुणे- सातारा रोड, सोलापूर रोड, प्रभातरोड हे प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीचा समारोप होईपर्यंत हे रस्ते बंद राहतील.
गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मंडईतील टिळक पुतळा येथून होणार आहे. पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका केवळ यांसारख्या वाहनांसाठी वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे. तसेच सोमवारी दुपारनंतर शहरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात येतील.


No comments:

Post a Comment