Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Friday, September 7, 2018

Cityblog Feature: MPC News

Pune : पुणेकरांनी वाहतूक नियमभंगापोटी 8 महिन्यात भरला 22 कोटींचा दंड
एमपीसी न्यूज – वाहतूक विभागाकडून 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट  या कालावधीत नियमभंग करणा-या एकूण 10 लाख 18 हजार 560 वाहनचालकांकडून तब्बल 22 कोटी 54 लाख 62 हजार 259 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. 
यामध्ये सर्वाधिक कारवाया या झेब्रा क्रॉसिंगच्या आहेत. एकूण 3 लाख 37 हजार 384 कारवाया करून 6 कोटी 74 लाख 76 हजार 800 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. तर लेन कटींगच्या सर्वात कमी कारवाया करण्यात आल्या असून केवळ 354 कारवाया करून 70 हजार 800 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. तर दारू पिऊन गाडी चालविणारी एकही केस दाखल करण्यात आलेली नाही. तर हेल्मेट न घालणा-या दुचाकी चालकांवर 36 हजार 930 प्रकरणे दाखल असून त्यांच्याकडून एकूण एक कोटी 84 लाख 65 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment