Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Thursday, September 6, 2018

Cityblog Feature: Sajag Nagrik Manch

प्रति,
माननीय मनपा आयुक्त
पुणे. 
 
विषय - CCTV भाड्याने घेण्याच्या प्रक्रियेत मनपाचे मोठे नुकसान व गैरप्रकार. 
 
गेली अनेक वर्षे पुणे मनपा गणेशउत्सवा दरम्यान विविध घाटांवर CCTV कॅमेरे बसवते. यंदाही पुणे मनपाने शहरातील विविध घाटांवर अनेक  ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यासाठी एकूण सुमारे ५० लाख रुपयांच्या  निविदा जारी केल्या. या निविदा स्थायी समिती किंवा अतिरिक्त आयुक्त यांचेकडे मंजुरीसाठी पाठवाव्या लागू नयेत म्हणून जाणून बुजून ५ वेगवेगळ्या निविदांमध्ये मिळून सुमारे ५० लाखांच्या कामांचे विभाजन करण्यात आले आहे. मागील वर्षी देखील हाच प्रकार करण्यात आला होता आणि तेंव्हा या निविदांना नाईलाजाने मान्यता देताना माननीय अतिरिक्त आयुक्त सौ. शीतल तेली उगले यांनी खालील आक्षेप घेतले होते. 
 
१ - समान कामांसाठी आर्थिक तरतुदींचे विभाजन करून स्थायी समितीची मान्यता टाळण्याचा सकृत दर्शनी उद्देश्य दिसून येतो.
२ - आर्थिक तरतूद मे २०१८ मध्ये उपलब्ध असून ही प्रत्यक्ष निविदा मान्यतेसाठी ऐनवेळी (गणेशउत्सवां दरम्यान) सादर करण्यात आली .
सदरहू निविदा पर्याय नसल्याने मान्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले होते भविष्यात एकाच आर्थिक तरतुदीचे विभाजन करून निविदा मागविण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे असे बजावले होते. त्यांच्या निर्देशांचा भंग करीत यंदा ही ५ वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या आहेत. गेली ५ वर्षे पुणे मनपा दरवर्षी गणेश विसर्जन घाटांवर भाड्याने CCTV कॅमेरे घेण्यासाठी ५० लाख रुपये खर्च करते आहे. गेली ५ वर्षे आम्ही सातत्याने मागणी करत आहोत कि ही यंत्रणा ५० लाख रुपयांमध्ये कायमस्वरूपी विकत घेता येऊ शकते व वारी पासून गणेश उत्सवापर्यंत हव्या तेंव्हा फक्त Labour Charges Basis वर बसविण्यासाठी अत्यन्त  कमी खर्चात निविदा काढता येऊ शकतात. मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष्य करून दरवर्षी कंत्राटदाराच्या फायद्यासाठी वारी आणि गणेश उत्सव या दोन्ही वेळी मिळून जवळपास ७० लाख रुपये CCTV यंत्रणा भाड्याने घेण्यावर खर्च केले जातात. मुळातच गणेश विसर्ज घाटांवर CCTV बसविणे हे शांतात, सुव्यवस्था व सुरक्षितता यासाठी आवश्यक असल्याने ते पोलिसांचे काम आहे, तरीही खर्च करायची संधी सोडायची नाही, या हेतू ने मनपा हे काम करत आहे. 
आमची मागणी आहे कि आपण ही टेंडर्स तातडीने रद्द करून ही यंत्रणा विकत घेण्याचे टेंडर काढावे. यंदाचा गणेश उत्सव पूर्ण होताच ही सर्व यंत्रणा पोलिसांकडे कायमस्वरूपी सुपूर्त करावी. जेणेकरून पुढील काळात त्यांना ही यंत्रणा, वारी व गणेश उत्सव व अन्य अनेक प्रसंगी वापरता येईल. याच बरोबर जाणून  बुजून एकाच कामाचे विभाजन करून वेगवेगळी टेंडर्स काढून भाड्याची यंत्रणा घेऊन काम काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. 
विवेक वेलणकर                   विश्वास सहस्रबुद्धे        पुणे /०४-०९-१८
सजग नागरिक मंच             सजग नागरिक मंच  

No comments:

Post a Comment