Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Tuesday, October 2, 2018

Cityblog Feature MPC News

Pune : उद्यापासून लष्कर जलकेंद्राचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू

एमपीसी न्यूज- मुठा उजवा कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण होत आले असून उद्यापासून या भागातील पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेतील पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.
खडकवासला धरणातून पाणी वाहून नेणारा मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर पुण्यातील लष्कर जलकेंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाठी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. दरम्यान फुटलेल्या कालव्याचे काम पूर्ववत होत आले आहे. त्यामुळे उद्यापासून या भागातील पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेतील पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.


No comments:

Post a Comment