Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Wednesday, October 10, 2018

From Sajag Nagrik Manch

माननीयमनपा आयुक्त
पुणे.
विषय - केंद्रसरकारला सेवाकर वेळेत भरल्यामुळे, पुणे मनपाला . ८० कोटी व्याज भराव्या लागल्या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे बाबत.
महोदय,
पुणेमनपाच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने जाहिरात फलकांपोटी ०१-०४-२००६ ते ३१-०३-११ अखेर पर्यंतचा सेवाकर जाहिरातदारांकडून वसूल केल्याने केंद्र सरकारच्या सेवाकर विभागाने . ०८ कोटी सेवाकर मनपाला भरायला सांगितला होता. याविरुद्ध पुणे मनपाने कारसल्लागार मार्फत २०१५ मध्ये अपील दाखल केले. मात्र करसल्लागाराच्या फी ला मान्यता मिळाल्याने या अपिलाचा एकतर्फी निकाल पुणे मनपाच्या विरोधात दिला गेला. त्यानंतर पुढे या निकाला विरुद्ध Tribunal कडेही वर्षात अपील दाखल करण्यात आले नाही. सेवाकर विभागाने मनपाला नोटीस पाठवून या . ०८ कोटी रकमेवर . ८० कोटी व्याज . ०८ कोटी रुपये  दंड भरण्यास सांगितले. यावर मनपाने मूळ रक्कम .०८ कोटी रुपये . ८० कोटी रुपये व्याज दिनांक २५-०९१८ रोजी भरले असून दंडाची रकम . ०८ कोटी रुपये बाबत अपील करणार असल्याचे सेवाकर विभागाला कळविले आहे. हे अपील खूप उशिरा ने झाला असल्याने संबंधित अपिलात Daley Condon होण्याची शक्यता असल्याने कर सल्लागाराने मनपाला कळविले आहे. अश्या परिस्थितीत मनपाला . ०८ कोटी रुपये दंड ही भरावा लागेल. या सगळ्यात मुळातच जाहिरातदारांकडून हा सेवाकर का वसूल केला गेला नाही, अपिलाचा निकाल एकतर्फी लागून ही हा सेवाकर वेळात का भरला नाही ? Tribunal कडे अपील करायला उशीर का झाला ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
आपणासविनंती कि मूळ सेवकाराची रकम जाहिरातदारांकडून वसूल करण्यात अपयश आल्याचा तसेच दामदुप्पट व्याज दंड भरायला लागल्याचा घटनेची दक्षता विभागाकडून चौकशी करून नागरिकांच्या करांचे पैसे दंड व्याजापोटी वाया घालविणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई करून हे पैसे त्यांचेकडून वसूल करावे.

विवेकवेलणकर                  विश्वास सहस्रबुद्धे                 पुणे / ०३-१०-१८

No comments:

Post a Comment