Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Tuesday, December 18, 2018

Giridarshan Treks to Harischandragad

हरिश्चंद्रगड ट्रेकर्क्सची पंढरी
हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकर्स ची पंढरी हा ट्रेक करायचा म्हटलं की एकच उत्साह येतो, आणि आधीच्या इथल्या आठवणी जाग्या होतात, कधी पाचनई कधी खिरेश्वर तर कधी नळीची वाट अशा वाटांनी आपण या गडावर गेलेलो असतो, कोकण कड्यावरचा सूर्यास्त बघून तृप्त झालेले असतो, केदारेश्वरच्या पाण्यात डुबकी मारण्याचा थंडगार अनुभव घेतलेला असतो, हरिश्चंद्रेश्वराच्या दर्शनाने पावन झालेलो असतो , गणेश गुहेमध्ये शांत समाधी लागलेली असते, कधी तारामती शिखरावरून दिसणारा परिसर आठवतो तर कधी कोकण कड्यावरचा सोसाट्याचा वारा शिरशिरी आणत असतो, असा हा आठवणींचा कल्लोळ होतो आणि कधी एकदा आपण गडावर जातो या साठी मन अधीर होऊन जाते, कोकण कड्यावर बसून समोर अस्ताला जाणार सूर्य पाहणे हा तर आयुष्य भर लक्षात राहणारा अनुभ असतो
यावेळची हरिश्चंद्र गड वारी दि 22, 23 डिसेंम्बरला, एक बॅच पाचनई मार्गाने तर दुसरी नळीच्या वाटेने, दोघांचाही मुक्काम कोकण कड्यावर, 
21 ला रात्री निघायचं खाजगी बस ने आणि 23 ला संध्याकाळी 7 पर्यंत पुण्यास परत, 
दोनही ट्रेक ची फी रु 1800/-
येताना अंथरूण पांघरूण गरम कपडे, जादा कपडे, टॉर्च, 2 पाण्याच्या बाटल्या, ताटली, वाटी, ग्लास आणि शनिवार दुपारचा जेवणाचा डबा
नाव नोंदणी 20 डिसेम्बर पर्यंत
कॉल करा 8007290002

No comments:

Post a Comment