Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Wednesday, January 23, 2019

Cityblg Events Corner२४ ते २७ जानेवारी २०१९ या कालावधीत

*पु. . देशपांडे उद्यान, तानाजी मालुसरे पथ (याला लोक सिंहगड रस्ताही म्हणतात)*या ठिकाणी वरील चार दिवस *. १० ते रा. * या वेळेत ग्रंथ प्रदर्शन भरेल. या प्रदर्शनात नव्या पूर्वीच्या लेखकांची हजारो मराठी पुस्तके पाहण्याची, चाळण्याची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळेल.


या प्रदर्शनात आपली पुस्तके विक्रीसाठी ठेवू इच्छिणार्या वैयक्तिक लेखकांना, कवींना, साहित्यिकांना, प्रकाशकांना पुस्तक विक्रीसाठी गाळा ' प्रथम येईल त्यास प्राधान्य ' या तत्वावर विनामूल्य दिला जाईल.

प्रत्येक गाळ्यासोबत चार दिवसांसाठी दोन टेकूमंच (टेबल) मंचपोसांसह (टेबल क्लॉथ), तीन खुर्च्या आणि पुरेशी प्रकाशनलिका (ट्यूबलाईट) व्यवस्था विनामूल्य पुरविली जाईल.

पुणे मराठी ग्रंथालय या पुणे शहरातील नामांकित संस्थेतील दुर्मीळ आणि जुने ग्रंथ जुनी पुस्तके पाहण्याची (पणे मराठी ग्रंथालयाची दुर्मीळ ग्रंथसंपदा विक्रीसाठी नसेल. )

याशिवाय शासनाची प्रकाशने विक्रीस असतील. 
लहान मुलांसाठी योग्य अशा पुस्तकांचा खजिना, कथासंग्रह, कवितासंग्रह, विज्ञानकथा, वैज्ञानिक माहिती, वैचारिक समीक्षा या विषयांवरील पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.

ग्रंथप्रदर्शनाच्या वर्तुळाकार संयोजनाच्या मधील भागात एक व्यासपीठ आणि २०० खुर्च्या यांची व्यवस्था आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे ! या ठिकाणी कोणालाही पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन, एकपात्री प्रयोग, जादूचे प्रयोग, कागदाचे कातरकामातून खेळणी, प्रेक्षकांची रेखाचित्रे, अर्कचित्रे काढून देणे, नाट्यवाचन, काव्यवाचन असे उपक्रम करावयाचे असतील तर कृपया लवकरात लवकर संपर्क साधून २४ ते २७ जानेवारी दरम्यानची वेळ निश्चित करावी.

सदर ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणचे व्यासपीठ यंत्रणा वापरण्यास हौशी गटांना, कवींच्या समूहांना, प्रकाशन कार्यक्रमासाठी लेखक, प्रकाशकांना कोणतेही भाडे किंवा शुल्क भरावे लागणार नाही मात्र वेळेवर संपर्क साधून वेळ निश्चित करावी लागेल याची सर्वांनी नोंद घ्यावी, ही या गटावरील सर्व सदस्यांना विनंती !

पुणे महानगरपालिकेची

*मराठी भाषा संवर्धन समिती*

ही समिती या संमेलनाची संयोजक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा -

- अनिल गोरे (मराठीकाका)

सदस्य, मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका.

९४२२००१६७१

No comments:

Post a Comment