Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Wednesday, July 31, 2019

Babuji and PuLa


पुलंनी १९६८ साली बालगंधर्व रंगमंदिराच्या उदघाटनाच्या निमित्ताने काही कार्यक्रम आयोजित केले होते. त्यापैकी एक देखणा कार्यक्रम म्हणजे बालगंधर्वांच्या संगीतावर आधारित असलेला 'गंधर्व गीतांजली'.  या कार्यक्रमाची सांगता स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे , सुप्रसिद्ध संगीतकार/गायक बाबूजी, अर्थात सुधीर फडके आणि अर्थातच आपले लाडके पु.. देशपांडे यांनी एकत्र सादर केलेल्या 'अवघाचि संसार सुखाचा करीन' या बालगंधर्वांच्या अभंगाने झाली. यावेळी पु.. देशपांडे पेटीवर होते मात्र या सर्व दिग्गज गायकांनी पुलंना गाण्याचा आग्रह केला ते देखील आपण या क्लिपमध्ये  13:05 ला ऐकू शकता. या क्लिपमधील फोटो देखील त्याच कार्यक्रमातील आहे. पुलंचे भाचे दिनेश ठाकूर यांच्या सहकार्याने ही ध्वनिफीत उपलब्ध झाली आहे. सुनीताबाईंच्या पश्चात हा सर्व अनमोल ठेवा दिनेश यांनी परिश्रमपूर्वक जतन करून ठेवला आहे !

No comments:

Post a Comment