Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Saturday, August 18, 2018

Cityblog Tribute: Atalji by Amul

Cityblog Feature MPC news

एमपीसी न्यूज – पुणे विद्यापीठ चौकातील तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला नाकाबंदी करून पकडले आहे. ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली होती. दरम्यान, विद्यापीठ चौकात भरदिवसा गर्दीत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 
समीर किसन येणपुरे (वय 39, रा. मेहदले गैरेज, एरंडवणा) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गोळीबार करणा-या शुक्राचार्य मधाळे आणि त्याच्या साथीदाराला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
समीर याचा फ्लेक्स लावण्याचा व्यवसाय आहे. तर, आरोपी शुक्राचार्य मधाळे याची एरंडवणे भागात टपरी होती. अतिक्रमण विभागाने मधाळे याची टपरी तोडली. समीर येणपुरे याच्या सांगण्यावरुनच अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली, असा संशय मधाळे याला होता. आज शनिवारी समीर विद्यापीठ चौकातून जात होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या शुक्राचार्य याने समीर याच्यावर गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्या समीर याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वर्दळीतील आणि भरदिवसा घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गोळीबार करणा-या शुक्राचार्य आणि त्याच्या साथीदाराला हिंजवडी पोलिसांनी नाकाबंदी करून पकडले आहे. चतुःशृंगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Cityblog User: Shankar Mahadevan Breatheless in Current

Cityblog User: And Pak wants Kashmir

Giridarshan Trekking Article

Cityblog User: Work Life Balance

Friday, August 17, 2018

Cityblog Feature MPC news

आयटी हब म्हणून मान्यता मिळाल्यामुळे देशभरातून आयटी प्रोफेशनल्सचा पुण्याकडे ओढा असतो. मात्र पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून या आयटी कंपन्या त्यांच्याकडे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या इंजिनिअरना या ना त्या कारणाने कामावरुन काढत आहेत. अनुभवी इंजिनियरना कामावरुन काढून नव्या तरुणांना कमी पगारात कामावर ठेवून नफा कमावण्याचा या कंपन्यांचा उद्देश आहे. मात्र यामुळे हजारो आयटी इंजिनिअर बेरोजगार बनत आहेत. त्यामुळे कोणा आयटी इंजिनिअरवर ड्रायव्हर म्हणून कॅब चालवण्याची वेळ आली आहे तर कोणी बेकरी उघडली आहे.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी या तरुणांनी एक फोरमही स्थापन केला आहे. मात्र सरकार दरबारी प्रतिसाद मिळत नसल्याने या तरुणांनी गुरुवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

MPC

Cityblog User: Music from Past

Cityblog User: Raireshwar Trekking
Cityblog User: New Colored Version of song from Saheb Bibi and Gulam

Cityblog User: Motivational

Cityblog User: Travel : Crooked Street SF