Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Saturday, September 8, 2018

Happy Birthday Ashatai

Happy Birthday Ashatai

Click link below to see one of her versatile songs


Cityblog Feature : MPC News

Pune : सात देशांचा एकत्रित युद्धसराव पुण्यात होणार !

एमपीसी न्यूज- परदेशातील सैन्यांसोबत सौहार्दपूर्ण वातावरण राहावे तसेच उपनगरी भागातील दहशतवादाला आळा घालण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून भारतीय लष्करातील सदर्न कमांड हे भूतान, श्रीलंका, बाग्लांदेश, थायलंड, नेपाळ या देशाच्या सैन्यदलांसोबत लष्करी सराव करणार आहे. 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान पुण्याजवळील औंधमध्ये हा लष्करी सराव होणार आहे. अशी माहिती सदर्न कमांड प्रमुख डी.आर. सोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लेफ्टनंट जनरल सोनी म्हणाले, “‘बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टरल अ‍ॅण्ड इकॉनॉमिकल कॉर्पोरेशन’ (बिमस्टेक) संघटनेमध्ये भारत, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश होतो. ‘बिमस्टेक’ देशांमध्ये जगाच्या लोकसंख्येपैकी 22 टक्के लोकसंख्येचे वास्तव्य आहे. दहशतवादाचा बीमोड करणे हे या सर्व देशांपुढील समान उद्दिष्ट आहे.
या युद्धसरावादरम्यान 15 सप्टेंबर रोजी सातही देशांच्या लष्कर प्रमुखांच्या एकत्रित परिषदेचे आयोजन करण्यात आले असून भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत या युद्ध सरावाचा समारोप होणार आहे. सहभागी देशांचे प्रत्येकी पाच लष्करी अधिकारी आणि पंचवीस ज्युनिअर कमिशन अधिकारी या युद्ध सरावामध्ये सहभागी होणार आहेत. भारताचे माजी राजदूत जी. पार्थसारथी संयुक्त युद्ध सरावाचे निरीक्षक म्हणून काम करणार आहेत. याआधी अशा पध्दतीचा लष्करी सराव बांग्लादेश, भूतान, म्यानमार येथे झाला होता.

Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon


Cityblog Feature : Ashish Joshi's Wildlife Photography

CityBlog Feature : Amita Nene's Yummy Expression

Cityblog User: From Traffic Police

Cityblog User: For Asha Kishore Fans

Friday, September 7, 2018

Cityblog Feature: MPC News

Pune : पुणेकरांनी वाहतूक नियमभंगापोटी 8 महिन्यात भरला 22 कोटींचा दंड
एमपीसी न्यूज – वाहतूक विभागाकडून 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट  या कालावधीत नियमभंग करणा-या एकूण 10 लाख 18 हजार 560 वाहनचालकांकडून तब्बल 22 कोटी 54 लाख 62 हजार 259 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. 
यामध्ये सर्वाधिक कारवाया या झेब्रा क्रॉसिंगच्या आहेत. एकूण 3 लाख 37 हजार 384 कारवाया करून 6 कोटी 74 लाख 76 हजार 800 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. तर लेन कटींगच्या सर्वात कमी कारवाया करण्यात आल्या असून केवळ 354 कारवाया करून 70 हजार 800 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. तर दारू पिऊन गाडी चालविणारी एकही केस दाखल करण्यात आलेली नाही. तर हेल्मेट न घालणा-या दुचाकी चालकांवर 36 हजार 930 प्रकरणे दाखल असून त्यांच्याकडून एकूण एक कोटी 84 लाख 65 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon


Cityblog User: Japan Typhoon Images


Giridarshan Appeal


Cityblog User: SwarSwapna

Cityblog User: P Chidambaram

Cityblog Ads CornerRiviera Monaco was launched on 26th January 2018 with possession in December 2021.
The Developer of Riviera Wongamat and Riviera Jomtien, namely the Riviera Group has just launched their third project called 
" The Riviera Monaco"
This multi-award winning developer is synonymous with providing modern, high quality and stylish buildings, so be one of the first to take advantage of this new and exciting investment opportunity.
The Riviera Monaco is to be situated just 200 meters from the beach in the upmarket neighbourhood of Na-Jomtien and is comprised of 404 exclusive units ranging from studios to 2 bedroom fully furnished and fitted apartments spread across a 40 story, high rise building with outstanding amenities such as a sky pool and gym.
1. Booking fee is THB 50,000 for studio and 1-bed; AND THB 100,000 for 2-bed and Duplex
2. Sinking fund is THB 500 per sq.m. (one time payment)
3. Monthly maintenance fee is THB 50 per sq.m. (12 months payable in advance)
Thanking You
Regards,
Sandeep Sahasrabudhe
Worldwide Properties 
Cell: 98223 29045

Thursday, September 6, 2018

Cityblog Feature : MPC News

Pimpri : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक गुरुवारी दोन तास बंद राहणार

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग गुरुवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल, असे महामार्ग वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनाक्याच्या आधी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडतर्फे ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या पुणे- मुंबई मार्गावर वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा. या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना थांबवून ठेवण्यात येईल. त्यामुळे अवजड वाहनचालकांनी आधीच नियोजन करावे, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे.


Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon


Cityblog Feature: Sajag Nagrik Manch

प्रति,
माननीय मनपा आयुक्त
पुणे. 
 
विषय - CCTV भाड्याने घेण्याच्या प्रक्रियेत मनपाचे मोठे नुकसान व गैरप्रकार. 
 
गेली अनेक वर्षे पुणे मनपा गणेशउत्सवा दरम्यान विविध घाटांवर CCTV कॅमेरे बसवते. यंदाही पुणे मनपाने शहरातील विविध घाटांवर अनेक  ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यासाठी एकूण सुमारे ५० लाख रुपयांच्या  निविदा जारी केल्या. या निविदा स्थायी समिती किंवा अतिरिक्त आयुक्त यांचेकडे मंजुरीसाठी पाठवाव्या लागू नयेत म्हणून जाणून बुजून ५ वेगवेगळ्या निविदांमध्ये मिळून सुमारे ५० लाखांच्या कामांचे विभाजन करण्यात आले आहे. मागील वर्षी देखील हाच प्रकार करण्यात आला होता आणि तेंव्हा या निविदांना नाईलाजाने मान्यता देताना माननीय अतिरिक्त आयुक्त सौ. शीतल तेली उगले यांनी खालील आक्षेप घेतले होते. 
 
१ - समान कामांसाठी आर्थिक तरतुदींचे विभाजन करून स्थायी समितीची मान्यता टाळण्याचा सकृत दर्शनी उद्देश्य दिसून येतो.
२ - आर्थिक तरतूद मे २०१८ मध्ये उपलब्ध असून ही प्रत्यक्ष निविदा मान्यतेसाठी ऐनवेळी (गणेशउत्सवां दरम्यान) सादर करण्यात आली .
सदरहू निविदा पर्याय नसल्याने मान्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले होते भविष्यात एकाच आर्थिक तरतुदीचे विभाजन करून निविदा मागविण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे असे बजावले होते. त्यांच्या निर्देशांचा भंग करीत यंदा ही ५ वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या आहेत. गेली ५ वर्षे पुणे मनपा दरवर्षी गणेश विसर्जन घाटांवर भाड्याने CCTV कॅमेरे घेण्यासाठी ५० लाख रुपये खर्च करते आहे. गेली ५ वर्षे आम्ही सातत्याने मागणी करत आहोत कि ही यंत्रणा ५० लाख रुपयांमध्ये कायमस्वरूपी विकत घेता येऊ शकते व वारी पासून गणेश उत्सवापर्यंत हव्या तेंव्हा फक्त Labour Charges Basis वर बसविण्यासाठी अत्यन्त  कमी खर्चात निविदा काढता येऊ शकतात. मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष्य करून दरवर्षी कंत्राटदाराच्या फायद्यासाठी वारी आणि गणेश उत्सव या दोन्ही वेळी मिळून जवळपास ७० लाख रुपये CCTV यंत्रणा भाड्याने घेण्यावर खर्च केले जातात. मुळातच गणेश विसर्ज घाटांवर CCTV बसविणे हे शांतात, सुव्यवस्था व सुरक्षितता यासाठी आवश्यक असल्याने ते पोलिसांचे काम आहे, तरीही खर्च करायची संधी सोडायची नाही, या हेतू ने मनपा हे काम करत आहे. 
आमची मागणी आहे कि आपण ही टेंडर्स तातडीने रद्द करून ही यंत्रणा विकत घेण्याचे टेंडर काढावे. यंदाचा गणेश उत्सव पूर्ण होताच ही सर्व यंत्रणा पोलिसांकडे कायमस्वरूपी सुपूर्त करावी. जेणेकरून पुढील काळात त्यांना ही यंत्रणा, वारी व गणेश उत्सव व अन्य अनेक प्रसंगी वापरता येईल. याच बरोबर जाणून  बुजून एकाच कामाचे विभाजन करून वेगवेगळी टेंडर्स काढून भाड्याची यंत्रणा घेऊन काम काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. 
विवेक वेलणकर                   विश्वास सहस्रबुद्धे        पुणे /०४-०९-१८
सजग नागरिक मंच             सजग नागरिक मंच  

Giridarshan Video

Cityblog User: For Sudha Murthy Fans

Cityblog User: For Rafi fans

Wednesday, September 5, 2018

Cityblog Feature MPC News

Pune : बुधवार पेठेत दहीहंडीच्या बक्षीस वितरणावेळी स्टेज कोसळले ; 10-15 जण जखमी (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- दहीहंडी साजरी झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी स्टेज कोसळून 10 ते 15 जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री 11 च्या सुमारास बुधवार पेठेतील एका दहीहंडी मंडळात घडली.
दहीहंडीचा थरार संपल्यानंतर बुधवार पेठेतील डिस्को बिल्डींगच्या शेजारील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने बक्षिस वितरणाचा कार्यक्रम सुरु असताना स्टेजवर कार्यकर्त्यांची संख्या जास्त झाल्याने तो भार जास्त झाल्यामुळे स्टेज क्षणार्धात खाली कोसळले. या घटनेत मंंडळाचे 14 ते 15 कार्यकर्ते जखमी झाले. त्यापैकी 4 ते 5 जणांंना गंभीर फॅक्चर झाले आहे.


Cityblog Feature : Fitcon's Fitness Tips


Cityblog Events Corner


Cityblog feature: Amita Nene's Yummy Expressions

Amita is a Finance & HR professional, currently on a sabbatical after 15 years of a corporate career. Pursuing her Post Graduation in Child and Family Counselling currently, she uses her spare time to fathom creativity in various forms and thereby enrich life experiences. An avid traveller, she has travelled across varied locales and cultures and each of these places have left a mark on her persona. She has combined her passion for writing with her passion for exploring creativity in cuisine to make this blog a memoir of her culinary pursuits. You can view her work at https://yummyexpressions.wordpress.com/Cityblog User; Janmasthami festival in Thailand


Cityblog User: Japan Olympics Preparation

Cityblog User: Motivational by Deepak Chopra

Tuesday, September 4, 2018

Cityblog Feature : MPC News

Hinjawadi : हिंजवडीची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आता ‘वन वे’चा प्रयोग

पोलीस आयुक्तांची शिवाजी चौकात सरप्राईज व्हिजिट

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी हिंजवडी येथील शिवाजी चौकात सरप्राईज व्हिजिट दिली.  शिवाजी चौकासह हिंजवडी विभागात सुरू असलेल्या वाहतूक नियंत्रण याबाबत वाहतूक पोलिसांकडून माहिती घेतली. यावेळी हिंजवडी मधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हिंजवडी मधील शिवाजी चौकात पीक अवर्समध्ये वन वे करण्याबाबत सूचना दिल्या. हा वन वे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी स्वतः चौकात उभा राहून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली. पुण्याकडून हिंजवडीकडे आयटी कंपन्यांमध्ये येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत. याचा स्थानिक नागरिकांना सुरुवातीला थोडा त्रास होणार असला तरी याचे दुरगामी परिणाम खूप चांगले असणार आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पुणे-हिंजवडी या मार्गावर आज (सोमवारी) दुपारपासून वन वे बाबत काही बदल करण्यात आले होते, या बदलाबाबत पुणे-हिंजवडी या मार्गावर प्रवास करणारे आयटी प्रवासी कार चालक स्वप्नील तळपदे आणि दुचाकी चालक विशाल कुराडे यांना तात्पुरत्या बदलाबाबत आयुक्तांनी विचारले. बदल करण्यात आलेल्या मार्गावरून प्रवास करताना इतर दिवशी पेक्षा वेळ कमी लागल्याचे प्रवाशांनी आयुक्तांना सांगितले.
कार चालक स्वप्नील तळपदे यांनी सांगितले की, “हिंजवडी फेज तीन ते शिवाजी चौकापर्यंत येण्यासाठी दररोज अर्धा ते पाऊण तास लागतो, परंतु आज वाहतुकीत बदल केल्यामुळे 20 ते 25 मिनिटे वेळ कमी लागला.”

हिंजवडी वन वे 
# सकाळी आठ ते अकरा 
मार्ग – पुणे – हिंजवडी शिवाजी चौक मार्गे हिंजवडी एमआयडीसी, फेज 2, फेज 3 कडे
# सायंकाळी चार ते सात
मार्ग – हिंजवडी एमआयडीसी, फेज 2, फेज 3 कडून शिवाजी चौक मार्गे पुण्याकडे
# स्थानिक नागरिकांसाठी – शिवाजी चौकातून गावठाण मार्गे भूमकरवस्ती हा रस्ता वापरता येणार आहे.

Cityblog Feature: Nayakgiri

Whats Up: Come September

Have you selected your Ganapati Idol? Have you planned the decoration? Are you participating in Society/locality Ganapati pandal? Are you performing anywhere during festival or at school? Can you listen to dhol tasha practise? HIS arrival augurs all that is auspicious. Countdown begins.


Asian Games India has worn 15 golds among the total of 69 medals at Jakarta Asian Games. Has our sports administration changed its earlier bureaucracy and non caring attitude ? Or is the something. I think its about young aspirational India. Thanks to few visionary PMs, economic benefits have percolated to masses, across urban and rural regions. This young India knows value of success, they want to excel. They are ready to do hard work, make sacrifices and cannot settle for less. Each of these unknown athletes from hinterlands has a story. Known stars like PV Sindhu whom we highly regard as in last month’s  whats up. When will her jinx with Gold medal end.

India lose series; First test was close, Second was bad, in third we showed character to outplay England. But again fourth though might sound one sided but was fought well by Team India. Wishing they restore pride of a 3-2 result at oval. The main reasons for losses?
1. Lack of preparation: Playing only one 3 day match. Limited over cricket is different and also different set of players barring mainstays like Captain. Dhawan, Umesh, Rahane (who was in reserves).
2. Wrong Selections for test. When we needed 4 seamers at edgbaston we had only  Three, While in second test as well as in fourth we needed 2 spinners but we had one.
3. Batting failure: Openers, lower order did not support Kohli though Rahane, Pujara
and Rahane did that in test we won or we fought. Both tests at Edgbaston and Southampton were won by contributions from Curran. Broad/Anderson pair sounded threatening while Moeen Ali surprised. Their batting sounded shaky except Butler, Bairstow, Stokes and Curran

Cityblog Feature: Fitcon's Fitness Tips


Cityblog Events Corner


Cityblog User: Testing a car


Cityblog User: For Ravishankar Fans

CityBlog User: Fine Dining Experience


Monday, September 3, 2018

Cityblog Feature: MyMPC News

Pimpri : जन्माष्टमी उत्सवासाठी भाविकांच्या गर्दीने फुलली श्रीकृष्ण मंदिरे
एमपीसी न्यूज- आज सर्वत्र कृष्णाअष्टमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील श्रीकृष्ण मंदिरात अत्यंत उत्साहात श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जात आहे. विविध मंदिरातून धार्मिक कार्यक्रमांचे तसेच भजन, कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निगडीच्या श्रीकृष्ण मंदिरात तसेच आकुर्डी स्टेशनमागील इस्कॉनच्या श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे.
निगडीच्या इस्कॉनच्या श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसन्न मुद्रा असलेली राधा कृष्णाची मूर्ती सुवासिक फुलांनी आणखीनच खुलून दिसत आहे.
मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना सातारा, कराड, कोल्हापूर, मंचर, नारायणगाव, यासह विविध भागातील भाविक उपस्थित राहणार आहेत. भाविकांसाठी सोमवारी दिवसभर दर्शन चालू राहणार आहे. संध्याकाळी सात वाजता भजन, आठ ते अकरा राधाकृष्णांचा अभिषेक, रात्री बारा वाजता महाआरती केली जाणार आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.
संध्याकाळी शहरातील सार्वजनिक दहीहंडी मंडळातर्फे ठिकठिकाणी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे शहरांत सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Cityblog Feature: Fitness tips from Fitcon


Cityblog User: Demonetization

Cityblog User: Japan Olympics plans

Cityblog User Trains in Israel

Shravani Somwar: Neelkantheswar

Sunday, September 2, 2018

Cityblog User: MPC News

New Delhi : जैन मुनी तरुण सागरजी यांचे निधन
एमपीसी न्यूज- आपल्या अमोघ वाणीने अहिंसेचे तत्वज्ञान जनमानसामध्ये रुजवणारे जैन मुनी तरुण सागरजी (वय 51 )आज पहाटे यांचे दिल्ली येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना कावीळ झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता दिल्ली मेरठ रस्त्यावर असलेल्या तरुणसागरम तीर्थ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निधनाची बातमी कळताच त्यांच्या अंतिम दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने दिल्लीकडे धाव घेतली आहे.

Citybog Feature: Fitcon Fitness Tips


Cityblog Events Corner


Cityblog User: For Kaushiki Chakaborty Fan


Cityblog User: From the space

Spaceship Cassini's last picture as it entered Saturn Atmosphere and burnt up

CityBlog User: For Pu La Fans

Cityblog User: Motivational