Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Monday, May 5, 2014

Story of Pune

|| कहाणी पुण्याची ||
रेल्वे स्टेशन ची entry पुणे ,
तर उतरल्या बरोबर समोर दिसणारी country पुणे.....
नवसाचे दगडूशेठ गणपती बाप्पा पुणे,
तर रात्रभर चौकात रंगणाऱ्या गप्पा पुणे.....
धोतरवाल्या काकांच्या नाकावरचा राग पुणे,
तर महिलांचे आवडते एकमेव ठिकाण तुळशी- बाग पुणे.....
सिंहगडवरचे कांदा-भजी पुणे,
तर evening walk ला सोबत दिसणारे आजोबा-आजी पुणे.....
mom ऐवजी still preferred आई पुणे ,
जिथे कधी कोणालाही कसलीही नसते घाई पुणे.....
बालगंधर्व मधले नाटक रंजक पुणे ,
तर तरुणाईसाठी असलेला पुरोषोत्तम करंडक पुणे.....
लक्ष्मीरोड वरचे सोने-चांदी पुणे ,
तर ज्ञानेश्वर माउलींची आळंदी पुणे.....
शिक्षणाचे माहेरघर पुणे,
तर समोरच्याने कितीही डोके आपटले तरीही "माझच खर " पुणे.....
FC & JM रोड वर भरले जाणारे तरुणाईचे अड्डे पुणे,
तर पाउला-पाउलानवर जाणवणारे रस्त्यातील खड्डे पुणे.....
पेठांमधील घर आणि वाडे जुने पुणे,
तर घरमालकांची ठरलेली नावे जोशी, कुलकर्णी अथवा आपटे पुणे.....
संध्यकाळी Z-bridge वरच्या जोडप्यांच्या हातातील-हाथ पुणे,
तर सदाशिव पेठेतील जेवण वरण-भात पुणे.....
शिक्षकांचा आवडता शब्द माठ्या पुणे,
तर नको तिथे लावल्या जाणाऱ्या पाट्या पुणे.....
शिस्त नसल्यामुळे होणारे traffic-jam पुणे ,
तर वर्षभर पाणी पुरेल इतका साठा असलेले खडकवासला dam पुणे..
kinetic honda असलेली, समजली जाणारी मुले dude पुणे ..
तर सर्वात जास्त हिरवळ असणारे kothrud पुणे..
गृहिणींची दुपारची झोपायची वेळ पुणे,
तर रिकामटेकद्यांचे रम्मीचे खेळ पुणे..
प्रत्येक comment वर मिळणारी टाळी पुणे ,
तर जगप्रसिद्ध अशी कानातील बिग-बाळी पुणे..
century ला जिथे आज हि बोलले जाते शतक
किंव्हा शंभर पुणे,
तर सर्वांचा patient dialog "१ नंबर" पुणे..
still follows विचार by अत्रे न कर्वे ते पुणे,
अन सर्वांची लाडकी अशी "मुक्त बर्वे" पुणे..
ते म्हणतात न जिथे कोणत्याही गोष्टीचे नाही उणे,
ते आमचे आगळे-वेगळे पुणे...
कारण पुणे तिथे काय उणे || कहाणी पुण्याची ||