Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Thursday, April 18, 2019

O Sajana



*सन १९५९*

कॅलिफोर्नियातील एक म्युझिक इंस्ट्रूमेंटचे दुकान

डेव्हिड वॉर्नर नावाचा मालक आणि क्रिस्टिना नावाची सेल्सगर्ल

दुकानासमोर एक ३५/३६ वर्षाचा इसम उभा होता, सगळी वाद्ये न्याहळत

क्रिस्टिनाला कुतुहल वाटले
तिनं त्याला आत बोलाविले

"तुंम्हाला कोणते वाद्य हवे आहे?" तिनं विचारले,

त्याने बोट दाखविले



" ओह! ते..?
सॉरी! पण ते खूपच उंच कपाटावर ठेवले आहे. त्याला कोणीच गिर्हाईक येत नाही"

"पण मला ते बघायचे आहे!"

तितक्यात डेव्हिड तिथे आला
म्हणाला ! "सर ते वाद्य वाजवायला खूपच कठीण आहे, एकतर त्याला कोणीही गिर्हाईक नाही, तुंम्ही विकत घेणार असाल तर काढतो!"

तो: "मी घेईन"

डेव्हिडने ते खाली काढले

तो: "मी वाजवून बघू का?"

डेव्हिड :" सर आंम्ही ऐकले आहे की इंडियात फक्त एकच जण आहे जो हे वाद्य वाजवितो, ते म्हणजे पं. रवीशंकर"
"तुंम्हाला नाही वाजविता येणार"!

तोमी प्रयत्न तर करतो
आणि महत्वाचे म्हणजे
तुंम्ही त्याला सितार म्हणता
आंम्ही त्याला सुरबहार सितार म्हणतो!"

आणि त्याने सूर छेडला ! अगदी तोच !!

डेव्हिडच्या दुकानासमोर तोबा गर्दी झाली

तो समाधानाने थांबला
डेव्हिड इतका खूष झाला की त्याने ती " सुरबहार सतार त्याला भेट दिली"

तो ही सुखावला

मुंबईत आल्यावर लगेचच
रेकॉर्डिंग स्टुडिओत त्याने तेच सुर छेडले

आणि एक "सदाबहार" गीत जन्माला आले

* सजना ..*
*बरखा बहार आई*
*रस की पुहार लाई*
*अखियोंमे प्यार लाई*
* सजना*

लतादीदीनी गायलेले हे गाणे
फिल्म *परख* (१९६०)

आणि तो कोण होता?

संगीतकार 
*सलील चौधरी"*

No comments:

Post a Comment