Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Thursday, September 27, 2018

Cityblog Feature: MPC News

Hinjawadi : नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करत हिंजवडी मधील चक्राकार वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करत वाहतूक विभागाने चक्राकार वाहतुकीत अंशतः बदल केले आहेत. हे बदल आज (दि. 25) ते 24 ऑक्टोबर या कालावधीत पुन्हा प्रायोगिक तत्वावर सुरु ठेवण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणा-या वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे 24 ऑक्टोबर पर्यंत लेखी स्वरूपात जमा कराव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.
पुढील एक महिना असा असेल बदल –
# शिवाजी चौकातून डावीकडे वळून विप्रोसर्कल फेज वन येथून उजवीकडून वळून जॉमेट्रीक सर्कल चौक येथून सर्व प्रकारच्या वाहनांनी इच्छित स्थळी जावे.
# शिवाजी चौकातून उजवीकडे वळण्यास व यूटर्न घेण्यास सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात आली आहे.
# शिवाजी चौकात येणाऱ्या आयटी कंपन्यांच्या बसेस व इतर सर्व जड वाहनांना वाकड ब्रिजकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. आयटी कंपन्यांच्या बसेस व अवजड वाहनांनी शिवाजी चौकातून डावीकडे वळून कस्तुरी चौकातून उजवीकडे वळून इंडियन ऑइल चौकातून इच्छीत स्थळी जावे. यामध्ये पीएमपीएमएल बसेस, अग्निशमन दलाच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.

# जांभूळकर जीम व शेल पेट्रोलपंपाजवळील डीव्हायडर पंक्‍चर हा स्थानिक नागरिकांसाठी कायमस्वरुपी खुला ठेवण्यात येणार आहे.
# इंडियन ऑईल पंप ते शिवाजी चौक दरम्यान असलेल्या डिमार्ट येथील डिव्हायडर पंक्‍चर, शिवाजी चौक ते फेज वन सर्कल येथील पाच डिव्हायडर पंक्‍चर फेज वन चौक ते जॉमेट्रीक सर्कल चौक दरम्यानचे सर्व डिव्हायडर पंक्‍चर आणि मेझा -9 चौक ते शिवाजी चौक दरम्यानचे दोन डिव्हाडर पंक्‍चर बंद करण्यात येत आहेत.
# भूमकर चौकातून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे. त्या सर्व वाहनांनानी शिवाजी चौकातून सरळ विप्रो सर्कल फेज -1 येथून इच्छित स्थळी जावे.
# माण गाव रोडवरुन विप्रो सर्कल फेज-1 चौकातून शिवाजी चौकाकडे सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्या सर्व वाहनांनी डावीकडे वळून जॉमॅट्रीक सर्कल येथून इच्छित स्थळी जावे.
# मेझा-9 चौकातून सर्वप्रकारच्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या सर्व प्रकाच्या वाहनांनी डावीकडे वळून शिवाजी चौकातून इच्छित स्थळी जावे.
# फेज 2 व 3 कडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जॉमेट्रीक सर्कल चौकातून येथून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या सर्व प्रकारच्या वाहनांनी सरळ शिवाजी चौकातून इच्छित स्थळी जावे.


No comments:

Post a Comment