Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Monday, September 10, 2018

Cityblog Feature: MPC News

Hinjawadi : हिंजवडीमध्ये रस्त्यांची डागडुजी सुरु

एमपीसी न्यूज – हिंजवडीमधील वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी सर्वच पातळ्यांवर मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु झाले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने 3 सप्टेंबर पासून हिंजवडीमधील वाहतुकीत काही बदल केले आहेत. हे डबल सुरुवातीला प्रायोगिकता तत्वावर सुरु असले, तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. एमआयडीसीकडून हिंजवडीच्या मुख्य रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे.
शासनाच्या विविध विभागांच्या जाळ्यात अडकलेली हिंजवडी वाहतुकीबाबत देखील खूप गुंतली आहे. हिंजवडीला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी सर्वच विभागांनी कंबर कसली आहे. हिंजवडी मधील शिवाजी चौक, डी मार्ट समोरील रस्ता, फेज वन, जॉमेट्रिक सर्कल या मार्गावरील अतिक्रमणे वेगाने काढण्यात आली. ही अतिक्रमणे काढत असताना वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सुद्धा स्वतः अतिक्रमणातील साहित्य उचलण्याचे काम केले. अतिक्रमण हटविल्यानंतर लगेच रस्त्यांचे रुंदीकरण आणि डागडुजीचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. रस्त्यांच्या डागडुजीमुळे आता वाहने सुसाट धावतील, असा विश्वास हिंजवडीकर व्यक्त करीत आहेत.
सध्या सुरु असलेल्या विविध उपायांमुळे हिंजवडीतील अडकून पडलेली वाहतूक कोंडी धावती झाली आहे. वाहतूक विभागाकडून हिंजवडी मधील स्थानिक नागरिकांसाठी शेल पेट्रोल पंपासमोर एक पंक्चर सुरु केले आहे. तर डी मार्ट समोरील पंक्चर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावरील ही अंमलबजावणी पुढे 15 दिवस राबविण्यात येणार आहे. तसेच पुढील मुदतीत नागरिकांच्या आलेल्या सूचना आणि अडचणी लक्षात घेऊन अंतिम आदेश काढण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने मागील तीन वर्षांपूर्वी याबाबत एक सूचना दिली होती. ती अशी की, ‘हिंजवडीच्या प्रत्येक एंट्री पॉईंटला खाजगी वाहनांसाठी पार्किंग करावे. तिथून कंपन्यांपर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुरू करावी. एक कार एक माणूस हे आज दिसणारे चित्र बंद करून जर बस सुरू केली तर एका बसमागे चाळीस कार कमी होतील. आय टी इंडस्ट्री वाल्यांनी मेट्रो झिप ही खाजगी बस सेवा सुरू केली आहे. पण तिचाही वापर होताना दिसत नाही. ब-याच वेळा मेट्रो झिपच्या फे-या रद्द होतात. त्यामुळे खाजगी वाहतुकीवर ताण येतो. यावर उपाय करायला हवा.
काय आहेत हिंजवडीकरांच्या सूचना –
# आयटी कंपन्या आणि प्रशासनाच्या पुढाकारातून सार्वजनिक वाहतुकीला चालना द्यायला हवी
# हिंजवडीच्या एन्ट्री पॉईंट ला खाजगी वाहनांसाठी पार्किंग करावे
# रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे
# वाहतुकीची शिस्त पाळायला हवी
# बंद पडलेल्या वाहनांसाठी ठराविक अंतरावर टो-व्हॅन असावी
# नागरिकांसोबत सुसंवाद वाढवायला हवा
# हिंजवडीकडे येणा-या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करावे


No comments:

Post a Comment