Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Wednesday, September 12, 2018

Cityblog Feature: MPC News

Pune : कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ल्याप्रकरणी दोघे जेरबंद
एमपीसी न्यूज – पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीच (सर्वर) वर सायबर हल्लाप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली अाहे. तसेच याप्रकरणी आणखी पाच जणांची नावे उघडकीस आली आहेत. आज मंगळवारी (दि.11) दुपारी बाराच्या सुमारास पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली.
फहिम मेहफुज शेख (वय-27) आणि फहिम अजीम खान (वय-30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याचबरोबर महेश राठोड, कुणाल, अली, मोहंमद आणि अॅन्थनी या पाच जणांची नावे उघडकीस आली आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर मालवेअर हल्ला करून भारतासह २९ देशामधून विविध ठिकाणावरुन एटीएमच्या साहाय्याने ही रक्कम काढण्यात आली होती. पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीच (सर्वर) वर सायबर हल्ला करून तब्बल 94 करोड 42 लाख रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार 11 ऑगस्ट रोजी घडला होता. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने याप्रकरणी कारवाई करत दोघांना आज दुपारी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी आणखी पाच जणांची नावे उघडकीस आली असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर महेश राठोड, कुणाल, अली, मोहंमद आणि अॅन्थनी या पाच जणांची नावे उघडकीस असून त्यांचा शोध सुरू आहे.
या सर्वांनी कोल्हापुरातील विविध बँकातून 95 कार्डचे लोन करून तब्बल 89 लाख 47 हजार 500 रुपये काढल्याचे निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून अटक आरोपींना आज पुणे न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment