Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Monday, October 1, 2018

Cityblog Feature MPC News

Pune : कासारसाई घटनेतील नराधमांना फाशी द्या ;पिडीत मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात कॅंडल मार्च 
एमपीसी न्यूज  –  हिंजवडी, कासारसाई येथे गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार केलेल्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. तसेच तज्ञ सरकारी वकीलाची नियुक्ती करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, याचबरोबर पिडीत कुटुंबियांना लवकरात लवकर अर्थिक मदत देण्यात यावी यासाठी पुण्यात कॅंडल मार्च आयोजन करण्यात आले होते.
हिंजवडी, कासारसाई येथील दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी औषधोपचारार्थ रुग्णालयात दाखल आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यातील तरुण तरुनींनी  कॅंडल मार्च व श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थितांनी घटनेचा निषेध करुन आरोपींना फाशीची मागणी केली.
रविवारी सायंकाळी पुण्यातील भिडे पूल येथुन केळकर मार्ग -अप्पा बळवंत चौक मार्गे नदीपात्रातील रस्त्यावर या कॅंडल मार्चचा समारोप झाला. यावेळी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलीस श्रद्धांजली वाहण्यात आली.
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी साखर कारखाना परिसरात कायमस्वरूपी साखर शाळा सुरु करण्यात याव्यात. तसेच ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ जाहिर करावे. या महामंडळांतर्गत मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी उपस्थितांनी यावेळी केली.


No comments:

Post a Comment