Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Friday, August 17, 2018

Cityblog Feature MPC news

आयटी हब म्हणून मान्यता मिळाल्यामुळे देशभरातून आयटी प्रोफेशनल्सचा पुण्याकडे ओढा असतो. मात्र पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून या आयटी कंपन्या त्यांच्याकडे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या इंजिनिअरना या ना त्या कारणाने कामावरुन काढत आहेत. अनुभवी इंजिनियरना कामावरुन काढून नव्या तरुणांना कमी पगारात कामावर ठेवून नफा कमावण्याचा या कंपन्यांचा उद्देश आहे. मात्र यामुळे हजारो आयटी इंजिनिअर बेरोजगार बनत आहेत. त्यामुळे कोणा आयटी इंजिनिअरवर ड्रायव्हर म्हणून कॅब चालवण्याची वेळ आली आहे तर कोणी बेकरी उघडली आहे.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी या तरुणांनी एक फोरमही स्थापन केला आहे. मात्र सरकार दरबारी प्रतिसाद मिळत नसल्याने या तरुणांनी गुरुवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

MPC

No comments:

Post a Comment