Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Sunday, August 26, 2018

Cityblog Feature: MPC Newsएमपीसी न्यूज – पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो धावणार असल्याचे निश्चित झाले आहे. या दोन्ही मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)तयार झाला आहे. हा अहवाल सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. दिल्लीतील सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेने हा डीपीआर तयार केला आहे.
पहिल्या टप्यात मेट्रो पिंपरीपर्यंत धावणार होती. परंतु, मेट्रोचे काम वाढले असून एम्पायर इस्टेटच्या पुलापर्यंत गेले आहे. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी केली होती. त्यासाठी मोठे आंदोलन छेडले होते. त्यानंतर पालिकेने मेट्रोला निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नाशिकफाटा ते चाकण या मार्गावर देखील मेट्रो प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने मेट्रोला या दोन्ही मार्गावरील डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी पुणे महामेट्रोला तब्बल 4 कोटी 31 लाख रूपये पिंपरी पालिकेने दिले होते.
त्यानुसार पुणे महामेट्रोने पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा डीपीआर तयार केला आहे. दिल्लीतील सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेने हा डीपीआर तयार केला असून पुढील महिन्यात पालिकेला सादर केला जाणार आहे. पिंपरी ते निगडीदरम्यानच्या मेट्रोच्या बांधकामासाठी सुमारे 850 कोटी रुपये खर्च येणार असून, त्याव्यतिरिक्त भूसंपादनाचा खर्च येईल. या प्रकल्पाला स्वतंत्र गाडीची गरज भासणार नाही. संत मदर तेरेसा पुलानंतर काळभोरनगरपाशी चिंचवड स्थानक असेल. खंडोबाचा माळ येथे आकुर्डी स्थानक असेल, तर निगडी बस स्थानकापाशी निगडी मेट्रो स्थानक असेल.

No comments:

Post a Comment