Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Friday, August 31, 2018

Cityblog Special MPC

Pune : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका बंद ही निव्वळ अफवा

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर बँका सलग आठ दिवस सुट्टीवर असल्याचा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. मात्र, शनिवार, रविवार वगळता अन्य कोणत्याही दिवशी बँकांना सुट्टी नसून नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
2 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. सोमवारी 3 सप्टेंबरला दहीहंडी असल्यामुळे बँकांना सुट्टी असल्याचे व्हायरल मेसेजमध्ये सांगितले होते. मात्र, यादिवशी बँका नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंगळवार 4 आणि बुधवार 5 सप्टेंबरला ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चा संप आहे. मात्र, या संपाचा राज्यातील कोणत्याही बँकांशी संबंध नाही. त्यामुळे आरबीआयचा संप असला तरी बँका सुरु राहणार आहेत.
गुरुवार 6 आणि शुक्रवार 7 सप्टेंबरला नेहमीप्रमाणे बँका सुरु राहतील. 8 सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्यामुळे काही बँका बंद राहतील, तर 9 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे सर्व बँका बंद राहतील.
त्यामुळे बँका बंद असल्याच्या व्हायरला मेसेजमध्ये तथ्य नसून ग्राहकांनी गडबडून जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
तारीख – वार –

2 सप्टेंबर – रविवार – साप्ताहिक सुट्टी
3 सप्टेंबर – सोमवार – दहीहंडी, बँका सुरु
4 सप्टेंबर – मंगळवार – रिझर्व्ह बँकेचा संप, मात्र बँका सुरु
5 सप्टेंबर – बुधवार – रिझर्व्ह बँकेचा संप, मात्र बँका सुरु
6 सप्टेंबर – गुरुवार – बँका सुरु
7 सप्टेंबर – शुक्रवार – बँका सुरु
8 सप्टेंबर – शनिवार – दुसरा शनिवार – साप्ताहिक सुट्टी
9 सप्टेंबर – रविवार – साप्ताहिक सुट्टी

No comments:

Post a Comment