Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Monday, August 27, 2018

Cityblog Feature MPC News

Pune : कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी फोडण्यासाठी आता स्थानिक नगरसेवक रस्त्यावर 
एमपीसी न्यूज – पुणे शहरात मेट्रोचे काम मोठ्या झपाट्याने सुरु आहे. मात्र यामुळे शहरात कमालीची वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मेट्रोच्या या महत्वाकांशी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कर्वे रस्त्यावर वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कर्वे रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलाय पण त्याचबरोबर कर्वे रस्त्यालगत असणाऱ्या गल्लीबोळात सुद्धा प्रचंड कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 
त्यामुळे आता या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या परिसरातील वाहतुकीमध्ये काही बदल करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. खिलारे पथावरील पाडळे पॅलेस चौक ते सेंट्रल मॉल या दरम्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.
या पाश्र्वभूमीवर काही उपाययोजना करण्यासाठी या परिसरातील स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, जयंत भावे, दीपक पोटे यांनी त्यानुसार वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांच्यासमवेत पाहणी केली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, तसेच संजय देशपांडे देखील उपस्थित होते.
म्हात्रे पुलावरून तसेच मेहेंदळे गॅरेज चौकातून आणि हॉटेल निसर्गच्या गल्लीतून येणाऱ्या वाहनांना पाडळे पॅलेस चौकातून उजवीकडे वळण्यास म्हणजेच खिलारे पथावर जाण्यासाठी बंदी करण्यात येणार आहे. या मार्गावरून येणाऱ्या वाहनचालकांनी नळस्टॉप चौकातून यू टर्न घेऊन खिलारे पथावर यावे यासाठी नळ स्टॉप चौकातील सिग्नलची वेळ वाढविण्यासही तत्त्वत: मान्यता देण्यात आली. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे.
अशा असतील उपाययोजना
१) म्हात्रे पुलावरून तसेच मेहेंदळे गॅरेज चौकातून व हॉटेल निसर्ग च्या गल्लीतून येणाऱ्या वाहनांना पाडळे पॅलेस चौकातून उजवीकडे वळण्यास म्हणजेच खिलारे पथावर जाण्यासाठी बंदी करण्यात येणार असून या मार्गांवरून येणाऱ्या वाहनचालकांनी नळ स्टॉप चौकातून यु टर्न मारून खिलारे पथावर यावे किंवा नळ स्टॉप वरून कर्वे रस्ता मार्गे मार्गक्रमण करावे. त्यासाठी नळ स्टॉप चौकातील सिग्नल ची वेळ वाढविण्यास ही तत्वतः मान्यता देण्यात आली.(हा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असून त्यातून वाहतूक कोंडी सुटल्यास कायमस्वरूपी हा बदल करण्यात येईल )
२) पाडळे पॅलेस चौकातील सर्कल लहान करणे.तसेच पाडळे पॅलेस ते गरवारे कॉलेज रस्ता रुंदीकरण करणे व हा संपूर्ण रस्ता नो पार्किंग नो हालटिंग झोन करणे.
३) या रस्त्यावरील हातगाडीवाले,फेरीवाले,पथारीवाले यांचे युद्धपातळीवर पुनर्वसन करणे.
४) नळ स्टॉप चौकातील शौकीन पान समोर नो पार्किंग करणे.
५) कर्वे रस्त्यावरील पदपंथाचा आकार लहान करणे जेणेकरून वाहनांसाठी एक जादा लेन  उपलब्ध होईल.


No comments:

Post a Comment