Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Tuesday, October 9, 2018

Cityblog Feature: MPC News

Kothrud : टेम्पोचा ब्रेक फेल होऊन 8 वाहनांना धडक; पुण्यातील दिवसभरातील आणखी एक घटना


एमपीसी न्यूज –  ब्रेक फेल झालेल्या टेम्पोने रस्त्यावरील जवळपास 8 वाहनांना धडक देऊन वाहनांचे प्रचंड नुकसान केल्याची घटना आज सोमवारी (दि.8) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान कोथरूड येथील आशीष गार्डन चौकाजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने रस्त्यातील जवळपास 8 वाहनांना आशीष गार्डन चौकाजवळ टेम्पोने धडक दिली. त्यामुळे धडक बसलेल्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या अपघातात एकजण जखमी देखील झाला आहे. त्याठिकाणी असणा-या नागरिकांनी टेम्पो चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याप्रकरणी पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment